शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मध्ये अधिकृत प्रचाराचा धुरळा थांबला 

By धीरज परब | Updated: November 18, 2024 22:27 IST

वाहनांच्या विविध रॅली मुळे रस्ते घोषणांनी गजबजून गेले होते . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या अधिकृत प्रचाराची अंतिम मुदत सोमवार १८ नोव्हेम्बरच्या सायंकाळी ५ वाजे पर्यंत असल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील अधिकृत प्रचार संपला आहे . प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावत  शक्ती प्रदर्शन केले . शहरात आज वाहनांच्या विविध रॅली मुळे रस्ते घोषणांनी गजबजून गेले होते . 

सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवार आमदार गीता जैन , काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार मुझफ्फर हुसेन व भाजपाचे उमेदवार नरेंद्र  मेहता सह अन्य उमेदवारांनी वाहनांची रॅली काढली होती . त्यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे रॅली मुळे रस्ते  विविध रंगी झेंडे व कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते . 

लोकांशी जास्तीजास्त संपर्क साधण्यासह प्रचारात राहिलेला परिसर उरकून घेण्यावर देखील काहींनी भर दिला . आ . जैन , मुझफ्फर व मेहता यांच्यात मुख्यत्वे त्रिकोणी लढत असली तरी मनसेचे संदीप राणे , माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम व भाजपाचे बंडखोर हंसुकुमार पांडेय हे मतांची कशी जुळवाजुळव करतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . 

शहरातील आपण सुरु केलेली विकासकामे ठप्प पडल्याचा आरोप मेहतांनी आ . जैन यांच्यावर तर निवडणूक आल्यावर बाहेर पडणारा नेता अशी टीका मुझफ्फर यांच्यावर केली . 

शहरात २०१९ पूर्वी होणारी लूटमार , भ्रष्टाचार , गुंडगिरी रोखण्याचे काम केले. दोन ठिकाणी मेट्रोचे व सूर्या पाणी योजनेची कामे मेहतांनीच बंद पाडली . मेट्रो व त्याखाली उड्डाणपूल , पाणी योजना , सिमेंट काँक्रीट रस्ते , कोरोना काळात वैद्यकीय सुविधा व उपचार आदी अनेक कामे झाल्याचे आ . जैन म्हणाल्या . 

१० वर्षात शहराचे वाटोळे केले असून केवळ भ्रष्टाचार, जमिनी आणि जुन्या इमारतींवर डोळा ठेऊन मेहता व जैन यांनी केवळ स्वतःचा विकास केला अशी टीका मुझफ्फर हुसेन यांनी केली . 

अनेक राज्याचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री प्रचारासाठी आले . सभा व प्रचार मुख्यत्वे धार्मिक मुद्द्यांवरच एकमेकांवर आरोप - टीका करण्यात रंगला . 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024mira-bhayandar-acमीरा-भाईंदर