शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

नोकरीचे आमिष दाखवून प्रेयसीला केले शरीरविक्रीसाठी प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:29 AM

नोकरीच्या आमिषाने प्रियकरानेच कुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली.

ठाणे: नोकरीच्या आमिषाने प्रियकरानेच कुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. यामध्ये एका अल्पवयीन तरुणीचाही समावेश आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालविणारी बिनू तामंग (३४) या महिलेलाही अटक झाली आहे.भिवंडीच्या हनुमाननगर भागात सीमा आन्टी आणि बिनू तामंग या कुंटणखाना चालविणाऱ्या महिला काही ठराविक रक्कम स्विकारुन अल्पवयीन मुलींनाही शरीरविक्रयासाठी पाठवित असल्याची माहिती ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) या सामाजिक संस्थेमार्फत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, पोलीस नाईक निशा कारंडे, अक्षदा साळवी, विजय बडगुजर, विजय पवार आणि राजन मोरे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी भागातून एका १७ वर्षीय मुलीसह २० ते २२ वयोगटातील सहा तरुणींची सुटका केली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दलाल बिनू हिच्यासह तिघांविरुद्ध पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटणखाना चालविण्यासाठी खोली भाडयाने देणाºया पप्पू हजाम याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. गिºहाईकांकडून एक हजार रुपये घेऊन स्वत:कडे सातशे ते आठशे रुपये ठेवून उर्वरित पैसे ती या मुलींना द्यायची. कधी तेही पैसे या मुलींना देत नसल्याची माहिती समोर आली आहे.>सुटका केलेल्यामुली नेपाळच्यासुटका केलेल्या सहापैकी चार मुली नेपाळमधील असून दोन मुली कर्नाटकातील आहेत. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. दुसºया २२ वर्षीय मुलीला तिच्याच प्रियकराने नोकरीचे अमिष दाखवून या व्यवसायात ढकलल्याची बाब समोर आली आहे.>महिला अधिकाºयाला मारली मिठीया नरकयातनेतून पोलिसांनी सुटका केल्याचे या सहा मुलींना समजल्यानंतर त्यांच्यापैकी एका तरुणीने सुटका करणाºया पथकातील पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांना घट्ट मिठी मारली. त्यावेळी उपस्थित अधिकारीही गहिवरले.