शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 1:33 AM

लग्नाच्या आधी घेतलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत सोमवार, २१ जानेवारी रोजी उघडकीस आली.

भिवंडी- लग्नाच्या आधी घेतलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत सोमवार, २१ जानेवारी रोजी उघडकीस आली. पीडित विवाहितेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली.पीडितेच्या तक्र ारीची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परवेज हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो फरार झाला. लग्नाच्या आधी पीडित विवाहितेशी परवेजचे प्रेमसंबंध होते. प्रेमाच्या आणाभाका देत त्याने मार्च २०१८ मध्ये ती राहत असलेल्या घरातच तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाइलमध्ये पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. काही वर्षांनी तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी झाला. त्यानंतरही परवेज तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला; मात्र तिने नकार देताच लग्नाच्या आधीचे फोटो व्हायरल करण्याची आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन त्याने बलात्कार केला.विवाहितेच्या तक्र ारीनंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात परवेजविरोधात बलात्काराचा आणि तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे करत आहेत.