शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

पावसाची ‘झाडा’झडती!, झाड पडून ठाण्यात सहा गाड्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:25 AM

आठवडाभरापासून बेपत्ता झालेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत ठाण्यात अक्षरश: झाडाझडती घेतली.

ठाणे : आठवडाभरापासून बेपत्ता झालेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत ठाण्यात अक्षरश: झाडाझडती घेतली. जोरदार पावसाने ठाणे शहरात दोन ठिकाणी झाडे कोसळून सहा गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. या पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून उकाड्यापासृून मुक्तता होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जिल्ह्यात मागील २४ तासांत २०५ मिमी पाऊस पडला असून रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ठाणे शहरातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी सहा गाड्यांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनहातनाका परिसरातील इटर्निटी सोसायटीजवळ पार्क केलेल्या पाच चारचाकी, तर घोडबंदर रोडवरील रुणवाल इस्टेटजवळ पार्क केलेली एका चारचाकी अशा सहा गाड्यांवर झाडे पडली. तीनहातनाका येथे सोहनी उत्तमानी, मनीषा गिंदे, अनिल हेरूर, उमा हेरूर, नेहा शर्मा आणि रुणवाल इस्टेट येथे शरद दळवी यांच्या मालकीच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर ठामपा अग्निशामक दल आणि आपत्ती कक्षाच्या जवानांनी तातडीने धाव घेत झाडे हटवली. सकाळी ९.१५ ते ९.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.याशिवाय, मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक रविवारी दिवसभर विस्कळलेली होती. त्यात पावसाची सतत रिपरिप सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांतील बहुतांशी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ठाणे शहरात दोन शॉर्टसर्किटच्या घटनांसह दोन आगीच्या घटना घडल्या. काही सखल भागांत पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीला ठाणेकरांना तोंड द्यावे लागले. सुटीचा दिवस असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्यांना मात्र पावसामुळे बाहेर पडणे शक्य झाले नाही.दिवसभराच्या कालावधीत खाडीला कमीअधिक प्रमाणात भरती होती. ठाणे महापालिकेच्या अंदाजानुसार सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा काही ठिकाणी उसळल्या. ठाणे शहरात दिवसभराच्या कालावधीत २२ मिमी पाऊस पडला, तर जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजेपर्यंत २०५ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली. यामध्ये कल्याणला २५ मिमी, मुरबाडला १३.५०, उल्हासनगरला २२, अंबरनाथला १५.२०, भिवंडीला ७० आणि शहापूरला १२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.>जोरदार पावसामुळे भिवंडीतही झाडे पडली..भिवंडी : शहरात आजपर्यंत २०४ मिमी पाऊस झाल्याची माहिती मनपाने दिली असून, जोरदार पावसामुळे शहरातील वेताळपाडा व चाविंद्रा या दोन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सखल भागात पाणी साचले. खंडूपाडा, तानाजीनगर, नारपोली, दर्गा रोड, कारिवली, पद्मानगर, कल्याण रोड आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. काही भागांत अद्यापही गटारे साफ न झाल्याने त्या भागात पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुपारनंतर थोडी उघडीप झाल्यानंतर शहरवासीयांनी घराबाहेर पडत सुस्कारा सोडला.मात्र, काही मुख्य मार्गावर व अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा येथील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. रविवार असूनही सकाळपासून शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीसाठी अडथळा निर्माण झाला.>शेतकरी सुखावलामुरबाड : दडी मारलेल्या पावसामुळे हैराण झालेल्या नागरिकांना व पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकºयाला रविवारच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीकामाला वेग येणार आहे. आधीच पेरणी केलेली असल्यामुळे हा पाऊस त्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास शेतकºयांना आहे.