शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनासाठी शाळांना कुलूप

By admin | Updated: February 6, 2016 02:07 IST

शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली येथील प्राथमिक शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. तर, काही शाळांमध्ये माध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठविले जाते

अनिरुद्ध पाटील,  बोर्डीशिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली येथील प्राथमिक शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. तर, काही शाळांमध्ये माध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. शाळांना टाळे ठोकणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेने नवी मुंबई येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता, संघटनेतील शिक्षकांकडून ५०० रु. वर्गणी वसूल करण्यात आली असून अधिवेशन काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संघटनेत डहाणू तालुक्यात एक हजार पाचशे बावीस शिक्षकांपैकी एक हजार बारा शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी दिली. या अधिवेशन काळात बोर्डी परिसरातील बोर्डी केंद्रशाळेसह मानपाडा, वाघमारापाडा, नागणकस, शंकरपाडा, बीजपाडा, अस्वाली या आदिवासी पाड्यांवरील प्राथमिक शाळा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही शाळांमध्ये एक वा दोन शिक्षक अथवा सहायकांकडून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिल्यानंतर घरी पाठविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, शिवाय सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. (वार्ताहर)सुटी काळात अधिवेशन घ्या, अथवा अधिवेशनाकरिता राज्यभर शाळा बंद ठेवा. मात्र, शाळांना कुलूप लावणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.- प्रशांत पाटील, डहाणू पंचायत समिती सदस्य