भर पावसात स्थानिक भूमीपुत्रांचे आंदोलन; माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराचा स्थानिकांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:52 IST2025-08-08T19:51:50+5:302025-08-08T19:52:48+5:30

भिवंडी येथील डोहळे पडघा परिसरात विकसित होत असलेल्या गोदाम पट्यात माथाडी युनियनच्या नावाने लूट जेली जात आहे.

Locals protest in heavy rain; Locals are troubled by the arbitrary administration of Mathadi Union | भर पावसात स्थानिक भूमीपुत्रांचे आंदोलन; माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराचा स्थानिकांना त्रास

भर पावसात स्थानिक भूमीपुत्रांचे आंदोलन; माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराचा स्थानिकांना त्रास

भिवंडी येथील डोहळे पडघा परिसरात विकसित होत असलेल्या गोदाम पट्यात माथाडी युनियनच्या नावाने लूट जेली जात असून या लुटमारीच्या विरोधात स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्र येत शुक्रवारी सायंकाळी भर पावसात आंदोलन केले.यावेळी स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दत्ता पवार नावाच्या इसमाने माथाडी युनियनच्या नावाने पडघा डोहळे परिसरात मोठ्या प्रमाणात गोदाम कंपन्यांची लूट सुरु केली असून माथाडी युनियनमध्ये बाहेरच्या कामगारांना काम देत असून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगरापासून वंचित ठेवले आहे. माथाडी युनियनच्या आर्थिक लूट मारी मुळे गोदाम कंपन्या व बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.त्यामुळे येथील कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या शक्यता आंदोलक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्र येत भर पावसात आंदोलन केले.यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना माथाडी मध्ये समाविष्ट करावे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी केली आहे.

माथाडी युनियन च्या नावाने दत्ता पवार यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू केली असून त्याला सहाय्यक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे यांचे वरदहस्त आहे त्यामुळेच दत्ता पवारची मनमानी पडघा डोहळे परिसरात वाढली असून स्थानिक भूमिपुत्र रोजगारापासून वंचित आहेत, दत्ता पवार यांची मनमानी थांबली नाही तर यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलन करते स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र संकेत गोडविंदे यांनी दिला आहे. दत्ता पवार नावाचा बकासुर येथे पोसला जात असून त्याला वेळीच आवर घातले नाही तर येथील भूमिपुत्र देशोधडीला लागतील अशी प्रतिक्रिया स्थानिक भूमिपुत्र योगेश गायकर यांनी दिली आहे.

Web Title: Locals protest in heavy rain; Locals are troubled by the arbitrary administration of Mathadi Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.