Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 11:28 IST2023-07-19T11:27:46+5:302023-07-19T11:28:32+5:30

Thane Rain Update: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले आहेत.

Local services stopped between Badlapur and Ambernath railway stations due to water logging on the tracks | Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

- पंकज पाटील 
बदलापूर - बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले आहेत.

रात्रीपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी दहा वाजताच दरम्यान पावसाचा जोर वाढताच रेल्वे रुळावर देखील पाणी साचले होते. रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कोणताही अपघात घडू नये यासाठी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल थांबवण्यात आली होती. 10:18 मिनिटांनी बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणारी मुंबई दिशेकडील लोकल तब्बल अर्धा तास स्थानकातच उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील तात्काळत उभे राहावे लागले.

Web Title: Local services stopped between Badlapur and Ambernath railway stations due to water logging on the tracks