दिव्यात ट्रान्सफॉर्मर जळून खाक, चार ते पाच हजार घरांना बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 09:22 IST2017-10-13T09:19:44+5:302017-10-13T09:22:02+5:30
दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोडवर दोन ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी सकाळी आग लागली. यामुळे सुमारे 4 ते 5 हजार घरांना याचा फटका बसला आहे.

दिव्यात ट्रान्सफॉर्मर जळून खाक, चार ते पाच हजार घरांना बसला फटका
ठाणे - दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोडवर दोन ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी सकाळी आग लागली. यामुळे सुमारे 4 ते 5 हजार घरांना याचा फटका बसला आहे. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल गळती होत असल्याने ही आग लागल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिक रोहिदास मुंडे यांनी दिली.
वेळीच लक्ष न दिल्याने दिवाळीच्या तोंडावर दिव्यातील नागरिकांना नाहक आता अंधाराचा सामना करावा लागणार आहे. आठ दिवसांपूर्वी श्लोकनगर येथे ही ट्रान्सफॉर्मर उडाला होतो. तो सुरु करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ लागला होता. तसा वेळ आता घालवू नये अशी मागणी स्थानिक करीत आहेत. ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत अवघ्या काही मिनिटात आग आटोक्यात आणली.