ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 21:44 IST2021-04-10T21:44:05+5:302021-04-10T21:44:10+5:30

जिल्ह्यात आज दुपारी ही कमालीचे तापमान होते. त्यात बहुतांशी ठिकाणी लाँक डाऊनचा फिल पहायला मिळाल्याने रहिवाशांना घरातच बसून राहावे लागले.

Light showers in some places in Thane district | ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी 

ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी 

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर, मुरबाड परिसरात अवेळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रात्री ८.३० वाजे दरम्यान पडलेल्या या पावसाने नागरिकांना अल्लाद दायक वाटले. उष्णता व घामाच्या धारांपासून बचाव झाला 
         जिल्ह्यात आज दुपारी ही कमालीचे तापमान होते. त्यात बहुतांशी ठिकाणी लाँक डाऊनचा फिल पहायला मिळाल्याने रहिवाशांना घरातच बसून राहावे लागले. यामुळे घामाच्या धारांनी नागरीक हैराण झाले.  मात्र सायंकाळी अचानक गार हवा सुटली आणि रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पावसाचा अनुभव घेता आला. यामुळे सुखद धक्का ही नागरिकांना या अवेळी पावसाने शनिवारी देऊन आगामी चांगल्या पावसाची जाणीव करून दिली आहे. 

Web Title: Light showers in some places in Thane district

टॅग्स :Rainपाऊस