शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परवाना हातपाटीचा, मात्र उत्खनन सक्शनने

By admin | Updated: January 9, 2016 23:37 IST

कुंडलिका आणि कांडणे खाडीमध्ये अवैध सक्शन पंपाच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन पुन्हा सुरू झाले आहे. यासाठी कुंडलिका खाडीत ११३ तर कांडणे खाडीत २६ सक्शन पंप कार्यरत आहेत.

- मिलिंद अष्टीवकर,  रोहाकुंडलिका आणि कांडणे खाडीमध्ये अवैध सक्शन पंपाच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन पुन्हा सुरू झाले आहे. यासाठी कुंडलिका खाडीत ११३ तर कांडणे खाडीत २६ सक्शन पंप कार्यरत आहेत. खाडीतून हातपाटीने रेती काढण्याचा परवाना मिळवून सक्शन पंपच्या साहाय्याने अवैधरीत्या रेती उत्खनन केले जात आहे. चार महिन्यांसाठी ७०० ब्रास रेतीचा महसूल भरून गुरुवारच्या एका रात्रीतच १०० ब्रासहून अधिक रेतीचे उत्खनन करण्यात आल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. खाडीतील सक्शन पंप जप्तीची कारवाई तहसीलदार कधी करणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. तालुक्यात हातपाटीद्वारे रेती उत्खनन करण्यास जिल्हा महसूल शाखेने परवाने दिले आहेत. त्याचबरोबरच डुबकी मारून वाळूचे उत्खनन करण्यासही परवानगी आहे. कुंडलिका आणि भालगाव खाडीत हातपाटीने रेती उत्खननाचा परवाना घेऊन त्याऐवजी सक्शन पंप, होड्या आदी यंत्रणेच्या साहाय्याने रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले आहे. गुरुवारी रोह्याची आमसभा अर्धवट सोडून काही स्थानिक पुढाऱ्यांनी खाडीलगत जाऊन यासाठीचे क्षेत्रफळ वाढविले आणि एका रात्रीतच सुमारे १०० ब्रासहून अधिक रेतीचे उत्खनन केले. रेतीची वाहतूकही रात्रभर सुरू होती. मुंबई, पुणे आदी ठिकाणी येथून रेती जाते. शहरातही सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी शुक्रवारी पहाटे वाळूचे साठे केलेले दिसून आले.खारापाटी ते न्हावे आणि विशेष करून सानेगाव, यशवंतखार, करंजवीरा या गावालगतच्या खाडीतून रेती उत्खनन केले गेले आहे. महसूल प्रशासनाने चार महिन्यांच्या दीर्घ मुदतीत ७०० ब्रास रेती डुबकी मारून काढण्यासाठीचे परवाने दिले आहेत. प्रत्यक्षात दोन्ही खाड्यांमध्ये १४० हून अधिक सक्शन पंप रेती उत्खनन करीत आहेत. डुबकी मारून एका परमिटला एक होडीप्रमाणे दिवसभरात केवळ तीन ब्रास रेती काढणे हे शासकीय गणित सक्शन पंपामुळे मोडीत निघत आहे. दिवसाला एक सक्शन पंप आणि होडीच्या साहाय्याने साधारण २० ब्रास रेती काढली जाते. रात्री ही संख्या दुप्पट असते. गुरुवारी रात्रीत १४० पैकी निम्मे जरी सक्शन पंप वापरले गेल्यास किती महसुल बुडाला असेल याची आकडेवारी समोर येते.महसूल प्रशासन रेती वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते. रोहा तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले होते. मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून महसूल जमा करण्याचे टार्गेट महसूल प्रशासन पूर्ण करताना दिसून आले आहे. खोट्या पावत्या छापण्याची शक्कल काहींनी लढवल्याने ही कारवाईही बंद होणार आहे.