शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या - राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 6:02 PM

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन महापौर विनिता राणे यांनी सोमवारी  केले.

कल्‍याणः निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन महापौर विनिता राणे यांनी सोमवारी  केले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड व कल्‍याण रिंग रोड अंतर्गत पर्यायी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वन व महसूल विभाग यांच्‍या संयुक्‍त विदयमाने आंबिवली येथील वन जमिनी सर्व्‍हे नं. ११, २५/२ व २७/२ येथे वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.मागील वर्षी शासनाने दिलेले ३०  हजारचे वृक्ष लागवडीचे लक्ष्‍य दिले होते, ते आम्‍ही लोकसहभागातून पूर्ण केले होते. या वर्षीही महापालिका आपले ५० हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्‍य पूर्ण करू, असा विश्‍वास महापौर विनिता राणे यांनी व्‍यक्‍त केला. या प्रसंगी जिल्‍हाधिकारी, ठाणे राजेश नार्वेकर यांनी वृक्ष लागवड ही एक व्‍यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्‍मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्‍हावे, असेही ते म्‍हणाले. या उपक्रमात सर्व अभिकरणांनी महापालिकेस सहकार्य केल्‍याबद्दल कौतुक केले.तर उप वनसंरक्षक, ठाणे डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी महापालिकेला राज्‍य शासनाने या वर्षी ५० हजार वृक्ष लावण्‍याचे लक्ष दिलेले ते लक्ष यशस्‍वी करण्‍यासाठी लोकसहभाग आवयश्‍क असल्‍याचे सांगुन, वन विभाग महापालिकेस सहकार्य करेल असे सांगितले. तर कार्यकारी अभियंता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण जयवंत ढाणे यांनी सांगीतले की, रिंग रोडमध्‍ये बाधीत होणारी झाडे आम्‍ही तोडत असुन, तोडलेल्‍या झाडांची उणीव भरून काढण्‍यासाठी वृक्ष लागवडीकरीता एमएमआरडीए या उपक्रमाकरिता महापालिकेस निधी देत आहे.या प्रसंगी महापालिकेचे आयुक्‍त गोविंद बोडके, सभापती स्‍थायी समिती दिपेश म्‍हात्रे, सभापती महिला व बालकल्‍याण समिती रेखा चौधरी, सभापती परिवहन समिती मनोज चौधरी, सभापती शिक्षण समिती नमिता पाटील, गटनेते शिवसेना दशरथ घाडीगावकर, अ प्रभाग समिती सभापती दयाशंकर शेट्टी, पालिका सदस्‍य गोरख जाधव, हर्षाली थवील व आसपासच्‍या शाळेतील ४५०० विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यकमाचे  नियोजन शहर अभियंता सपना कोळी व मुख्‍य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी केले.