अपघात, लूटमार टाळण्यासाठी मुंब्रा बायपासवर एलईडी दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:17 IST2018-10-18T00:17:26+5:302018-10-18T00:17:47+5:30
ठाणे : काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंब्रा बायपासवरील संभाव्य अपघात तसेच लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठामपाने त्यावर एलईडी दिवे ...

अपघात, लूटमार टाळण्यासाठी मुंब्रा बायपासवर एलईडी दिवे
ठाणे : काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंब्रा बायपासवरील संभाव्य अपघात तसेच लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठामपाने त्यावर एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन कोटी १२ लाखांचा खर्च प्रस्तावित केला असून यासंदर्भातील प्रस्ताव २० आॅक्टोबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
मुंब्रा बायपास मार्ग हा अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. या वाहनांचा आकडा सुमारे १५ हजारांच्या आसपास आहे. याशिवाय कार, दुचाकी तसेच अन्य वाहनांचीही या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुरुस्तीसाठी हा महामार्ग बंद होता. काही दिवसांपूर्वीच तो सुरू झाला आहे. या मार्गावर अवजड तसेच अन्य वाहनांची सतत वर्दळ सुरू असली, तरी या मार्गावर पथदिवे बसवलेले नाहीत. ठाणे शहरातून अवजड वाहतुकीला सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत बंदी असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक दुपारी आणि रात्रीच्या वेळेस होते. रात्री जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. मात्र, येथे पथदिवे नसल्याने अंधार दिसतो. डोंगर भागातील वळण रस्त्यावर अंधार असल्यामुळे चालकांचे अंदाज चुकून अपघात होतात.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता या मार्गावर एलईडी पथदिवे बसवण्याची योजना आखली असून त्यासाठी दोन कोटी १२ लाख रु पयांचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शनिवारी होणाºया महासभेत हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.