शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:15 IST

नितीन गडकरींच्या घोषणेला विरोध; अगोदर ठाणेकरांची तहान भागवा, मग नाशिक-नगरचे बोला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहून समुद्राला मिळणारे पाणी धरण बांधून अडवून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांना देण्याची घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध करून आपले एकजुटीचे पाणी दाखवले आहे. अगोदर तहानलेल्या ठाणे जिल्ह्याला त्या धरणांतून पाणी द्या. मग, पाणी उरलेच तर नाशिक-नगर जिल्ह्यांना द्या, अशी रोखठोक भूमिका नेत्यांनी घेतली आहे.ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी सध्या भाजपासोबत सेनेची सतत खडाखडी सुरू असते. घनकचरा व्यवस्थापन, राज्य सरकारचा निधी, फेरीवाले, नागरी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली किंवा मीरा-भार्इंदर या महापालिकांत दिसते. उल्हासनगरात तर सत्तेकरिता शिवसेनेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतली. खुद्द ठाणे शहरात भाजपाचे नगरसेवक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले दिसतात. मात्र, ठाणेजिल्ह्यातील पाण्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत हेवेदावे विसरून सारे एकत्र आले. दरम्यान, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा संपूर्ण बंद असतो. जिल्ह्यालाही पाण्याची अतिशय गरज आहे.दरवर्षी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासाची कामे झाल्याने लोकसंख्या वाढत आहे. असे असताना त्यांच्यासाठी शासनाने नव्याने पाणीयोजना राबवली पाहिजे. यापूर्वीमुंबई व इतर महापालिका क्षेत्रांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून शहापूर व भिवंडी तालुक्यांत धरणे बांधली. परंतु, बाधित गावांना व तालुक्यातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन शासनाने निश्चित धोरण न आखल्याने ही स्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये धरण बांधले जात असेल, तर तेथील लोकांना त्याचे पाणी मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात कोठेही धरण बांधले जाणार असेल, तर स्थानिकांना पाणी मिळाले पाहिजे.- कपिल पाटील, खासदार, भाजपाठाणे जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अतृप्त आहे. ही गोष्ट खरी आहे की, नाशिक आणि ठाण्याने मुंबई नव्हे तर महाराष्ट्राची तहान भागवली आहे. परंतु, ठाणे जिल्हा त्यादृष्टीने पाण्यासाठी नेहमीच उपाशी राहिलेला आहे. आता पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईची स्थितीनिर्माण झाली आहे. मागील २५ वर्षे धरण बांधणार म्हणून आश्वासन दिले जात आहे. परंतु, ते काही बांधले गेले नाही. २००३ साली जे धरण मी आणले, ते धरण शिवसेनेच्या टक्केवारीमुळे रद्द झाले. आजही ठाणे शहराला भीक मागून पाणी आणावे लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. परंतु, पाण्यासाठी कोणतीच योजना आखली जात नाही. त्यामुळे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, आधी ठाणे जिल्ह्याची तहान भागवा, मग हव्या त्या योजना आणा.- जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसमागील ६० वर्षे ठाणे जिल्हा हा मुंबईची तहान भागवत आहे. ठाण्यासाठी धरण असावे, म्हणून शाई आणि काळू धरणांसाठी प्रयत्न झाले. परंतु, तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने धरण रखडलेले आहे. नगर आणि नाशिकला पाणी देण्यास काही हरकत नाही. परंतु, ते करतअसताना ठाणे जिल्ह्याची तहान आधी भागवणे गरजेचे आहे.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस