शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

मागील पाच वर्षात गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:44 PM

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात कोट्यावधींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देस्ट्रक्चरल आॅडीटसाठी २ लाख ९८ हजारांचा खर्चइतर कामांसाठी सुध्दा ४ कोटीहून अधिकचा खर्च

ठाणे - ठाण्याचे भुषण असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या १६ कोटी खर्चाच्या दुरुस्तीचा घाट ठाणे महापालिका प्रशासनाने घातला होता. परंतु महासभेत यावर चर्चा होण्यापूर्वीच प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतल्याचे जाहीर केले. परंतु मागील पाच वर्षात गडकरी रंगायतच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेने कोट्यावधीचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.                       ठाण्यातील दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी या संदर्भात माहितीचा अधिकार टाकला होता. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. मागील आठवडाभर गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन वादंग पेटला होता. गेल्यावर्षी या नाट्यगृहाच्या छताच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाच्या बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण केले होते. या परिक्षण अहवालातील सुचनांच्या आधारे प्रशासानाने नाट्यगृह दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, नाट्यगृहाच्या दुरु स्तीवर वारंवार पैसे खर्च होत असल्याचे सांगत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान नाटयगृहाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला होता. परंतु तो चर्चेला येण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.                     दरम्यान दत्ता यांनी मागिवलेल्या माहिती अधिकारात पालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च केल्याचे समोर आले आहे. २००८ मध्ये सुरवातीला विद्यतुच्या काही किरकोळ कामांसाठी ७९ लाख ३७ हजार १८० रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ४८ लाख २९ हजार ४००, २०१३-१४ मध्ये १९ लाख ३ हजारांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर स्क्ट्रचरल आॅडीटसाठी २०१५ मध्ये २ लाख ९८ हजारांचा खर्च झाला होता. तर रंगायतनाच्या बाहेरील बाजूस असलेल्या तीन पुतळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख ८० हजार, अग्निप्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी १९ लाख ९० हजार, अत्यावश्यक स्थापत्य कामे करण्यासाठी ९ लाख ९० हजार ३०० रुपये, छतामधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ९ लाख ११ हजार ४०० रुपये, रंगरंगोटीसाठी ९ लाख ३८ हजार, इतर कामासाठी ९ लाख ९९ हजार ८०० रुपये, छतावर तात्पुरती वेदर शेड टाकण्यासाठी २१ लाख ८० हजार १५५ रुपये, जिप्सम सिलिंग करणे व इतर कामांसाठी २० लाख ६१ हजार ५०० रुपये आणि पॉवर हाऊस चे वॉटर प्रुफींग करणे यासाठी ८ लाख १३ हजार ९०० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पैशाची उधळपट्टी कशासाठी असा सवाल दत्ता यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त