शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

गेल्या २० दिवसात एसटीच्या मार्फतीने ठाणे पोलिसांनी केली ८४ हजार मजूरांची घरवापसी

By जितेंद्र कालेकर | Published: June 01, 2020 11:10 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा मजूरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी बसेसच्या मदतीने ठाणे पोलिसांनी गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूरांनी मानले राज्य शासन आणि पोलिसांचे आभारएसटीने दिली मोफत सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या २० दिवसांमध्ये ठाणे पोलिसांनी राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसेसद्वारे तब्बल ८४ हजार ७३४ परप्रांतीय मजूरांची  महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घरवापसाी केली. ठाणे पोलीस आणि एसटीने केलेल्या सहकार्याबद्दल या मजूरांनी आता आभार मानले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. गाठीशी असलेला सर्व पैसा संपल्यामुळे त्यांच्या जेवणाचेही हाल होत होते. त्यामुळेच अनेकांनी पायपीट करीत तर कधी मिळेल त्या वाहनाने अगदी जादा पैसे मोजून १५०० ते १८०० किलो मीटरचा प्रवास सुरु केला होता. यात मजूरांचे आणखीनच मोठया प्रमाणात हाल होत होते. शिवाय, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडाला होता. याचीच खंबीर दखल घेत राज्य शासनाने एसटी तसेच काही ठिकाणी रेल्वेने या मजूंराची घरवापसी केली. रेल्वेलाही अनेक अडचणी असल्यामुळे ठाणे आणि भिवंडीतून मोठया प्रमाणात एसटीद्वारे या मजूरांना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.१० मे रोजी ३५ बसेसद्वारे ८५२ तर मजूरांना सोडण्यात आले. त्यानंतर ११ मे रोजी ११२ बसेसमधून तीन हजार २२ मजूर, १२ मे रोजी ९४ बसमधून दोन हजार ७९१ मजूरांना सोडण्यात आले. यात सर्वाधिक ३४९ बसमधून आठ हजार ७०० प्रवाशांना २४ मे रोजी सोडण्यात आले. तर २१ मे रोजी २३४ बसेसद्वारा पाच हजार ९२१ प्रवाशांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यात आले. १० ते २८ मे या २० दिवसांच्या कालावधीत तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी ठाण्यातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे आणि विशेष शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार