भिवंडी मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सापडला भला मोठा साप, असा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:18 PM2021-09-27T14:18:02+5:302021-09-27T14:21:09+5:30

या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. 

A large snake was found in the bungalow of Bhiwandi Municipal Commissioner | भिवंडी मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सापडला भला मोठा साप, असा पकडला

भिवंडी मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सापडला भला मोठा साप, असा पकडला

googlenewsNext

नितिन पंडीत - 

भिवंडी ( दि. २७ ) भिवंडीत अनेक ठिकाणी विषारी व बिनविषारी साप आढळत असतांनाच आता चक्क भिवंडी मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातच भला मोठा साप सापडला आहे. रविवारी रात्री शिरा त्याला पकडण्यात आले. साप बंगल्यात शिरला त्यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख हे बंगल्यात उपस्थित होते. त्यांनी मनपाच्या अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली असता अग्निशमन लाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. 




अग्निशमन दलाचे टीम लीडर लिडींग फायरमन नितीन चव्हाण, फायरमन कांतीलाल गुजर, सुभाष सस्ते यांनी हा साप पकडला आणि त्याला मुंबई नाशिक महामार्गवरील निर्मनुष्य ठिकाणी जंगलात सोडण्यात सोडले. या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. 

Web Title: A large snake was found in the bungalow of Bhiwandi Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.