लॅपटॉप ‘अपडेट’ करण्याच्या नावाखाली लॅपटॉप लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:16 IST2020-11-04T00:14:10+5:302020-11-04T00:16:59+5:30
लॅपटॉप अपडेट करण्याच्या नावाखाली बाळकूम पाडा क्रमांक एक येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा लॅपटॉप लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.

बाळकूम पाडा क्रमांक एक येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लॅपटॉप अपडेट करण्याच्या नावाखाली बाळकूम पाडा क्रमांक एक येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा लॅपटॉप लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळकूम पाडा क्रमांक एक येथील ३५ वर्षीय रहिवाशी हे त्यांच्या घरी असतांना २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अशोक नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. कंपनीचा लॅपटॉप अपडेट करण्यासाठी फोन केल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्याने घरी येऊन त्यांचा २० हजारांचा लॅपटॉप फसवणूकीने घेऊन पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मौसमकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.