ठाणे : एक लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली लॅपटॉपची बॅग घेऊन जाणा-या भार्इंदरपाड्यातील एका व्यापा-याला त्याच्या मानेवर किडा पडला आहे, असे सांगून ती बॅग लांबवल्याची घटना शनिवारी कासारवडवली सिग्नलजवळ घडली. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे पळून गेल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाडा येथे राहणारे व्यापारी अमोल सिंग (४३) हे शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कासारवडवली सिग्नलजवळून जात होते. याचदरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मानेवर किडा पडल्याचे सांगितले. पाण्याचा मग देत मान धुण्यास सांगून त्यांच्याकडील लॅपटॉपची बॅग घेतली आणि मोटारसायकलने गायमुखच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत एक लाख १० हजारांची रोकड, वाहनपरवाना, इतर बँकांचे धनादेश गेल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार करत आहेत...........................................
ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:50 IST
ठाणे : एक लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली लॅपटॉपची बॅग घेऊन जाणा-या भार्इंदरपाड्यातील एका व्यापा-याला त्याच्या मानेवर किडा पडला आहे, असे सांगून ती बॅग लांबवल्याची घटना शनिवारी कासारवडवली सिग्नलजवळ घडली. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे पळून गेल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाडा येथे राहणारे व्यापारी ...
ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली
ठळक मुद्देदोन चोरटे मोटारसायकलने गायमुखच्या दिशेने पळून गेलेपाण्याचा मग देत मान धुण्यास सांगून त्यांच्याकडील लॅपटॉपची बॅग घेतली