सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:19 IST2019-07-19T01:18:54+5:302019-07-19T01:19:00+5:30

तोल गेल्याने खाली कोसळून कुरबान मुजीबर मंडल (३६, मूळ रा. पश्चिम बंगाल) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास घडली.

A laborer's death falls on the seventh floor | सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू

सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू

ठाणे : वर्तकनगर येथील संदेश हाइट्स येथील सातव्या मजल्यावरील लाकडे गोणीत भरून घेत असताना तोल गेल्याने खाली कोसळून कुरबान मुजीबर मंडल (३६, मूळ रा. पश्चिम बंगाल) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी बांधकामाचा पर्यवेक्षक सलीम शेख याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
वर्तकनगर येथे आदित्य एंटरप्रायजेसतर्फे संदेश हाइट्स या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. १७ जुलै रोजी या बांधकामाच्या साइटवरील पर्यवेक्षक शेख याने कुरबान या बिगारी कामगाराला इमारतीच्या सातव्या मजल्यावरील लाकडे गोणीत भरून आणण्यास सांगितले होते. ही लाकडे तो गोणीत भरून घेत असतानाच तोल गेल्याने इमारतीवरून खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या साइटवर कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप कुरबान मंडल याचा मेहुणा कुतुबुद्दीन सरदार याने केला आहे.

Web Title: A laborer's death falls on the seventh floor