कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये फेरीवाल्यांकडूनच लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:01 IST2018-08-30T04:00:59+5:302018-08-30T04:01:31+5:30

एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना १९ आॅगस्टला घडली होती. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सहा दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली आहे

Kushi Nagar Express looters from hawkers | कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये फेरीवाल्यांकडूनच लुटमार

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये फेरीवाल्यांकडूनच लुटमार

कल्याण : एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना १९ आॅगस्टला घडली होती. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सहा दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १३ हजार ४५० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले चार कोयते आणि तीन मोबाइल हस्तगत केले आहेत. तर, एकाचा अजून शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपी हे इगतपुरी रेल्वेस्थानकातील फेरीवाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी खबºयांकडून मिळालेल्या माहितीद्वारे रेल्वे पोलिसांनी सायमन पॅट्रीक मॅन्वेल उर्फ पापा (१९), समीर मुस्ताक खान उर्फ बाबू (१९) तजमुल सलीम सय्यद उर्फ तैफ (१९), भूषण धोदमल उर्फ मन्या (१९) किशोर गिरी (१९) आणि दीपक खरात (१९) या सहा दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली. सायमन मॅन्वेल हा सराईत गुन्हेगार आहे. उर्वरित आरोपी हे कुटुंबियांसोबत इगतपुरी रेल्वे स्थानकावर फेरीवाल्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.

Web Title: Kushi Nagar Express looters from hawkers