शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ: सहा हजार नव्या मतदारांची नोंदणी तर ३०० मतदारांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 9:10 PM

ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमाद्वारे सहा हजार नवयुवकांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदारयादीमध्ये नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी दिली.

ठळक मुद्देतीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांचा समावेश४२ हजार ८४७ मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव साडे तीन हजार मतदारांनी केली नावातील दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नविन सहा हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. तर ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. या मतदारसंघामध्ये तीन लाख ५१ हजार ५०९ मतदार आहेत. यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी वागळे इस्टेट, रामनगर, आयटीआयच्या कार्यशाळा क्रमांक एक येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.३१ आॅगस्ट २०१९ रोजी नव्याने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीनुसार या मतदारसंघामध्ये एक लाख ९३ हजार ७४ पुरुष, एक लाख ५८ हजार २९१ महिला, १३४ सैनिक तर दहा इतर अशा तीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांची संख्या आहे. त्यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्राचा अभाव आहे. सुमारे ८७ टक्के म्हणजे तीन लाख आठ हजार ८६२ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असल्याचा दावाही तामोरे यांनी केला. मतदारयादीमध्ये तीन लाख पाच हजार १३८ मतदारांचे छायाचित्र आहे. तर ४६ हजार २३७ म्हणजे १३ टक्के मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये नाही.* एकूण ३७० मतदानकेंद्रवयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी ३७० पैेकी २५९ मतदानकेंद्र ही तळमजल्यावर आहे. उर्वरित १५ पहिल्या, सहा दुसऱ्या तर ९० केंद्र ही मंडपामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील ७८७ दिव्यांग मतदारांपैकी ७६६ मतदारांना तळमजल्यावर तर १७ मतदारांना पहिल्या आणि अवघ्या चार मतदारांना दुसºया मजल्यावर मतदानाची सुविधा केली आहे.........................तीन हजार ५०० मतदारांच्या नावात दुरुस्तीअलिकडेच १५ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारयादीसाठी विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सुमारे तीन हजार ५०० मतदारांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन नावात दुरुस्ती केली. गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. तर सहा हजार नवयुवकांनी मतदार यादीमध्ये मतदानाचा हक्क बजविण्यासाठी नोंदणी केल्याचे तामोरे यांनी सांगितले..........................दोन हजार २२० कर्मचाऱ्यांची नियुक्तीया मतदारसंघात ३७० मतदानकेंद्र असून त्याठिकाणी निवडणूकीच्या कार्यक्रमासाठी मतदानकेंद्र अधिकारी कर्मचारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी असे दोन हजार २२० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत..........................आयटीआयमध्ये मतमोजणीरामनगर येथील आयटीआयच्या कार्यशाळेमध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, मतमोजणी आणि इव्हीएमच्या स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे.....................गडकरी रंगायतनमध्ये होणार प्रशिक्षणमतदान अधिकारी यांच्यासाठी २७ सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे पहिले तर ११ आणि १२ आॅक्टोंबर रोजी दुसरे प्रशिक्षण आयटीआय वागळे इस्टेट येथे होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगkopri-pachpakhadi-acकोपरी पाचपाखडी