शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

कोकण महोत्सवामुळे संस्कृतीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:04 AM

विविध लोककला सादर; कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचा पुढाकार

कल्याण : निसर्गसंपन्न कोकणातील माणूस रोजगारासाठी मुंबई-उपनगरांत स्थायिक झाला. पण हा कोकणी माणूस आपल्या लाल मातीचा गंध कधीच विसरला नाही. मुंबईत जन्मलेली पिढीही कोकणातील गावावर तेवढेच प्रेम करते. कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडीतील पोटे मैदानावर झालेल्या कोकण महोत्सवाने लाल मातीतील संस्कृतीला नवे कोंदण मिळाले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे झालेल्या या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष्यपदी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे होते.पालखी मिरवणुकीने महोत्सवाला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील जाणनले येथील कलामंच, केळवली-लांजाचे शक्ती-तुरा डबलबारी यांची शाहिरी, शिवचक्र तीर्थ दशावतारी नाटक, ‘बायकोचा बैल’ हे मालवणी नाटक, परळचे डबल बारी भजन, मंगळागौर आदी कार्यक्रम झाले.प्रजासत्ताक दिनी महोत्सवात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्र म झाला. रविवारी शान कोकणची कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे विशेष आकर्षण होते. कुणकेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती.बिळवस (ता. मालवण) येथे शाळा सुरू करणारे माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्यासह विविध क्षेत्रांतील कोकणातील सुपुत्रांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकणतील मेवा, मसाले, लोणचे, खाद्यपदार्थ यांना खवय्यांची विशेष पसंती मिळाली. त्यातून बचत गटाच्या महिला आणि छोट्या व्यावसायिकांची लाखोंंची उलाढाल झाली.कोकणच्या कला, कलावंत यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचिवण्याचा महोत्सवातून प्रयत्न केला. माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व कोकण रिहवासी संघ, संघटना, मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कोकणातील माणूस महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आला याचा आनंद आहे.- संजय मोरे,अध्यक्ष, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान, कल्याण