कोनगाव पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे साडेसहा लाख किमतीचे मोबाईल नागरीकांना केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:50 IST2021-12-13T19:49:50+5:302021-12-13T19:50:14+5:30
- नितिन पंडीत भिवंडी - भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा ...

कोनगाव पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे साडेसहा लाख किमतीचे मोबाईल नागरीकांना केले परत
- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा करून मोबाईल चोरीला गेलेल्या नागरीकांना तब्बल ६ लाख ८७ हजार रुपये किमतीचे ५२ मोबाईल कोनगाव पोलिसांनी सोमवारी परत केले आहेत.
कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग भाट ,पोलीस अंमलदार कुशाल जाधव , विजय ताटे यांनी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मागील दोन महिन्यात चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत हे सर्व मोबाईल चोरट्यां कडून महाराष्ट्रासह कर्नाटक ,उत्तर प्रदेश ,बिहार या राज्यातून जप्त केले होते. सोमवारी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
मोबाईल आज सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला असून ज्याचा मोबाईल गहाळ अथवा चोरी होतो त्यावेळी ते हतबल झालेले असतात अशा वेळी पोलिसांनी केलेल्या तपासातून मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्नआज पोलिसांनी केला आहे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली . तर कोरोना काळात मुलांचा ऑनलाईन अभ्यास मोबाईल मध्ये सुरू असताना मोबाईल चोरीस गेल्याने मानसिक व आर्थिक फटका बसला होता परंतु पोलिसांनी आम्हाला आमच्या वस्तू परत करून दिल्याने मी स्वतः आनंद असल्याची प्रतिक्रिया नागरीक सुधाकर भोईर यांनी दिली आहे .