शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील कोकण महोत्सवाने मिळाला संस्कृतीला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 18:05 IST

रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते.

कल्याण - कोकण... नारळ-पोफळींच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारे. रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते. कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडीतील पोटे मैदानावर 19 ते 27 जानेवारी दरम्यान झालेल्या कोकण महोत्सवाने लाल मातीतील संस्कृतीला नवे कोंदण मिळाले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड महोत्सवाचे स्वागताध्यक्ष होते. 

पालखी मिरवणुकीने महोत्सव सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील जाणनले येथील कलामंच, केळवली- लांजाचे शक्ती तुरा डबलबारी यांची शाहिरी, शिवचक्र तीर्थ दशावतारी नाटक, बायकोचा बैल मालवणी नाटक, परळचे डबल बारी भजन, मंगलागौर आदी कार्यक्रम झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. रविवारी शान कोकणची कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे विशेष आकर्षण होते. कुणकेश्वर मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली होती. 

बिळवस (ता. मालवण) येथे शाळा सुरू करणारे माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत कोकणातील सुपुत्रांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  कोकणतील मेवा, मसाले, लोणचे, खाद्य पदार्थ यांना विशेष पसंती मिळाली. त्यातून बचत गटाच्या महिला व छोट्या व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल झाली. 

 कोकणच्या कला, कलावंत यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महोत्सवातून प्रयत्न केला. माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व कोकण रहिवासी संघ, संघटना, मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कोकणातील माणूस महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आला याचा आनंद आहे. - संजय मोरे, अध्यक्ष, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान, कल्याण

टॅग्स :kalyanकल्याणkonkanकोकण