शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:18 IST

Akshay shinde encounter : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर अक्षयच्या आईने संशय व्यक्त केला असून, गंभीर आरोप केले आहेत. 

Badlapur case Akshay shinde News : बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अटेकत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने आधी पोलिसाकडील बंदूक हिसकावली, त्यानंतर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. मात्र, अक्षय शिंदेच्या आईने पैसे घेऊन मुलाला मारल्याचा आरोप केला आहे.   टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले. 

चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदेची आई काय म्हणाली?

"अक्षय शिंदेला तुम्ही का घेऊन येत नाही, असे पोलिसांना बोलले, त्यावेळी पोलीस म्हणाला, 'अक्षय शिंदेला इथं बघितलं तर मारून टाकतील. मारून टाकतील म्हणून त्याला घेऊन यायला माणसं लागतात. त्याचा रिपोर्ट मोठा आहे', असे बोलत होते ते. मी पोरासोबत बोलले पण, पोरगा बोलला की मम्मी चार्जशीट पण आलेली नाही. मला केव्हा सोडवता? मी बोलले बाबा थांब जरा बघू आपण", असे अक्षय शिंदेच्या आईने सांगितले.

"त्याच्या हातामध्ये कुठले तरी पेपर होते, त्याला लिहून दिलेले. तो दाखवत होता मला. पण, मला काही समजत नाही. आम्ही शिकलेले नाही. मी बोलले पोराला मला वाचता येत नाही. पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराला. मला भरपाई करून द्या. नाहीतर आम्ही तिथे येऊ, आम्हाला पण गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे", असे अक्षय शिंदेची आई म्हणाली.

"तसं केलं असतं, तर माझं पोरगं शाळेत गेलं नसतं" 

"माझा पोरगा असं करू शकत नाही. पैसे देऊन माझ्या पोराला मारून टाकलंय. मी वाट बघतेय माझं पोरगं केव्हा निघेन. माझं पोरग असं करू नाही शकत. त्याच्यावर आरोप टाकून नेलेलं आहे. शाळेत दुसरं कुणीतरी केलेलं आहे. तसं केलं असतं तर माझं पोरगं शाळेत गेलं नसतं कामाला", असा दावा अक्षय शिंदेच्या आईने केला. 

"त्या बायांना का धरत नाही?"

"आम्ही त्याला घाण सवय लावलेली नव्हती. आम्हाला पण गोळ्या घालून मारावं त्या लोकांनी; आता आम्ही पण त्याच्या बरोबर मरणार. शाळेत ६ बायका आहेत. त्यातील बायका पळून गेल्या, त्यांना का धरत नाही?", असे मयत आरोपी अक्षय शिंदेची आई म्हणाली. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस