पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करुन लहान मुलाची केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:00 PM2024-03-26T17:00:54+5:302024-03-26T17:01:10+5:30

इबाद याची शोधा शोध सुरु झाली असल्याने त्याला घाबरूनच त्याची हत्या करण्यात आली होती.

Kidnapped and murdered by neighbor for money; Accused in police custody | पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करुन लहान मुलाची केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करुन लहान मुलाची केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बदलापूर :  गोरेगाव ( वांगणी) येथे खंडणीसाठी एका नऊ वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबातील सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. इबाद बुबेरे असे या मृत मुलाचे नाव आहे. घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. त्याकरीता गावातील तरुण सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी या दोघांनी इबादची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मृत इबादचे घर हे आरोपीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. इबाद याची शोधा शोध सुरु झाली असल्याने त्याला घाबरूनच त्याची हत्या करण्यात आली होती. 

बदलापूर नजीक असलेल्या गोरेगाव परिसरात सध्या रमजान सुरु असल्याने संपूर्ण गावातील लोक नमाज पठणासाठी गावातील मशीदीत जमा झाले. रात्री नमाज पठणाकरीता मुस्लीम बांधव मशीदीत होते. त्याचवेळी या गावातील नऊ वर्षीय मुलगा इबाद गायब झाला होता. इबादच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. त्या वेळी इबादचे वडिल मुद्दसीर यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यास २३ लाख रुपये द्या. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला. एकीकडे पोलिसांकडून इबादचा शोध सुरु होता. तर दुसरीकडे ग्रामस्थांकडून ही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरण कर्त्याने  त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड टाकून फोन करण्याच्या प्रयत्न केला. व आरोपी लोकेशन पोलिसांना कळून आले. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवी शोध सुरु केला. त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान, सफूयान यांच्यासह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती एस पी डी एस स्वामी यांनी दिली आहे.

Web Title: Kidnapped and murdered by neighbor for money; Accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.