कामगाराकडून कंपनीची ३० लाखांची राेकड लुटणारी केरळ टाेळी जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2025 22:46 IST2025-04-17T22:44:49+5:302025-04-17T22:46:44+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी: राेकडसह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

कामगाराकडून कंपनीची ३० लाखांची राेकड लुटणारी केरळ टाेळी जेरबंद
ठाणे: मुंबईच्या काळबादेवी येथील प्राॅमिस इंटरप्रायजेस या खासगी कंपनीची ३० लाखांची राेकड आसिफ अन्सारी (४३) या कामगाराकडून लुटणाऱ्या
विघ्नेश पाेकेन (३१, रा. केरळ) याच्यासह पाच जणांच्या टाेळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली.
या टाेळीकडून राेकडसह दहा लाख ५० हजारांचा ऐवजही हस्तगत केला आहे. ठाण्याच्या मुंब्रा भागात राहणारे अन्सारी हे २१ फेब्रुवारी २०२५ राेजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ते काम करीत असलेल्या प्राॅमिस इंटरप्रायजेस या कंपनीची ३० लाखांची राेकड बॅगेत भरुन मुंबईतून ठाणे रेल्वे स्टेशन येथे उतरुन फलाट क्रमांक एकजवळ असलेल्या पार्कींगमधील माेटारसायकल काढत हाेते. त्याचवेळी चार जणांच्या टाेळक्याने त्यांना घेराव घातला. त्यापैकी एकाने त्यांच्याकडील बाॅटलमधून त्यांच्या ताेंडावर रसायनाचा स्प्रे मारला. त्यानंतर त्यांच्याकडील राेकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून जबरी चाेरी केली हाेती.
याप्रकरणी नाैपाडा पाेलीस ठाण्यात जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाला हाेता. उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पाेलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पाेलीस िनरीक्षक अमित यादव आणि उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळावरील तांित्रक बाबींचे विश्लेषण करुन विघ्नेश, सुहात खाेया, प्रबुलदेव पुल्लीवता आणि अखिल पीव्ही या चाैघांना अटक केली.
त्यांच्याकडील चाेरीतील रकमेपैकी साडे सात लाख रुपये आणि प्रत्येकी दीड लाखांचे दाेन आयफाेन असा दहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याच चाैकशीत केरळमधून सुबिलेश बालक्रिश्वनन यालाही अटक केली. पाचही आराेपींना १९ एप्रिलपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
खास चाेरीसाठी गाठली मुंबई
पाचही आराेपी हे केरळमधील रहिवासी असून महाराष्ट्रात त्यांचे वास्तव्य नाही. जबरी चाेरी केल्यानंतर ते पुन्हा केरळमध्ये गेले हाेते. त्यांनी आणखी किती प्रकार केले, याचाही तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.