शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:29 AM

केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो.

कल्याण - केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. आता अत्याधुनिक साधने आल्याने पेपरलेस होणे गरजेचे आहे. त्यासाठी विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त प्रत्येक सदस्याला ई-मेलद्वारे पाठवल्यास महापालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने पेपरलेस होऊ शकतो, याकडे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.केडीएमसीच्या बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला. विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त यांचे कागद नंबरनुसार जुळवण्यात अनेक शिपाई गुंतून राहतात. तसेच विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्तांचे बाड तयार होते. महापालिकेने झेरॉक्स मशीन घेण्याचा विषय या सभेत उपस्थित केला. त्यावेळी याविषयाकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. गोषवारा व इतिवृत्त हे सविस्तर असते. ते ई-मेलद्वारे पाठवावेत. त्याची सुरुवात माझ्यापासून करा, अशी मागणी म्हात्रे यांनी सभापती राहुल दामले यांच्याकडे केली.वर्षाला झेरॉक्सद्वारे छायांकित प्रती काढण्यासाठी सात लाख ५० हजार पेपरचा वापर केला जात असेल, तर आपण किती तरी वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षतोडीस आपण परवानगी देत नाही. एक झाड तोडण्याच्या बदल्यात पाच झाडे लावण्याची हमी घेतो. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात हजारोंच्या संख्येत झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे किमान महापालिकेने ई-मेलचा वापर केल्यास सात लाख ५० हजार पेपरचा वापर टळू शकतो. त्यातून पर्यावरण संतुलनास मदत होऊ शकते, असे म्हात्रे म्हणाले.यावेळी सदस्य रमेश म्हात्रे म्हणाले, केडीएमसी ही देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका आहे. या प्रणालीचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जात आहे. असे असताना महापालिका पेपरलेस झालेली नाही.विषय पत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्ताच्या प्रतिसाठी साडेसात लाख कागदांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त महापालिकेचे विविध विभाग, १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालय आणि महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयातही पेपरचा वापर केला जातो. तेथे वापरल्या जाणाºया पेपरविषयी सभेत कोणतीही वाच्यता केली नाही. तसेच त्याचा तपशील सचिवांनी दिला नाही. यासाठी लागणारा कागदही वर्षभराच्या आकडेवारीत जास्त असण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजही पेपरलेस झालेले नाहीत. त्यामुळे महापालिकेत पेनलेस कारभार नाही. काही पर्यावरणप्रेमी सदस्यांनी पेपरलेस कारभार व्हावा, असा विचार व्यक्त केला असला तरी अन्य सदस्यांनी त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.सूचनेची अंमलबजावणी आवश्यकदोन्ही सदस्यांच्या मुद्यांचा विचार करून येत्या चार सभांची विषयपत्रिका सोडून गोषवारा, इतिवृत्त ई-मेलद्वारे पाठवल्यास कोणत्या सदस्यांना ते सोयीचे ठरणार आहे, तसे त्यांनी सचिव संजय जाधव यांना कळवावे. इतिवृत्त व गोषवाºयाच्या झेरॉक्स प्रती त्यांना दिल्या जाणार नाही. सगळ्या सदस्यांना ई-मेलची सवय लागणे एका झटक्यात शक्य नाही.त्यामुळे हळूहळू या सूचनेची अंमलबजावणी करावी. सगळ्यांनाच टॅब अथवा मोबाइलवर इतिवृत्त व गोषवारा वाचणे शक्य नाही. सगळेच काही टॅक्नोसॅव्ही नसतात. पण, सूचना चांगली आहे. पर्यावरणपूरक आणि पर्यायावर संतुलनासाठी सूचनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत दामले यांनी मांडले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या