शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फुकटचा पगार घेणाऱ्या कामगारांची खैर नाही, केडीएमसी आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:07 IST

KDMC News : केडीएमसीची ऑनलाइन महासभा काही दिवसांपूर्वी झाली. त्यात सर्वपक्षीय सदस्यांनी शहरांतील कचरा नियमित उचलला जात नाही. मनपाच्या १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत खाजगी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सफाई कामगार काम न करताच फुकटचा पगार लाटत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली जाणार असल्याचा सज्जड इशारा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. त्यामुळे बिनकामाचा पगार घेणाऱ्या कामगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.केडीएमसीची ऑनलाइन महासभा काही दिवसांपूर्वी झाली. त्यात सर्वपक्षीय सदस्यांनी शहरांतील कचरा नियमित उचलला जात नाही. मनपाच्या १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत खाजगी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचरा उचलला जात नाही. त्याच्या कामात अनियमितता आहे. या सगळ्य़ा तक्रारी सदस्यांनी केल्यावर त्यावर एक संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार स्थायी समिती दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, भाजप गटनेते शैलेश धात्रक, विरोधी पक्षनेते राहुल दामले आदींसह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे उपस्थित होते. जे कामगार कामावर हजर न राहता हजेरी लावतात. जे महापालिकेचा फुकट पगार लाटतात, त्यांच्याविरोधात धडक मोहीम सुरू केली जाईल. अचानक हजेरी शेडला भेटी देऊन त्यांचा शोध घेतला जाईल. प्रत्येक प्रभागांत दोन अतिरिक्त घंटागाड्या देणार कंत्राटदाराला अनियमितताप्रकरणी दंड आकारला जात आहे. महापालिका हद्दीत कचरा उचलण्यासाठी १३० घंटागाड्या आहेत. ४३ आरसी व्हॅन आहेत. १० डम्पर आहेत. तरीही काही ठिकाणी कचरागाड्या कमी पडत आहेत. काही प्रभाग आकाराने मोठे आहेत. ही बाब लक्षात घेता प्रत्येक प्रभागांत अतिरिक्त दोन घंटागाड्या वाढवून दिल्या जाणार आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली