स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:09 AM2018-06-26T01:09:03+5:302018-06-26T01:09:05+5:30

केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, केडीएमसीचा चार हजार शहरांच्या स्पर्धेतून ९७ वा क्रमांक आला आहे.

KDMC 97th in clean survey | स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर

Next

कल्याण : केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, केडीएमसीचा चार हजार शहरांच्या स्पर्धेतून ९७ वा क्रमांक आला आहे. महापालिकेस चार हजार गुण मिळाल्याने अधिकारी समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता महापालिकेने पहिल्या पन्नासमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
२०१६ मधील स्वच्छ सर्वेक्षणात ७७ शहरांमधून महापालिकेचा क्रमांक ६७ वा आला होता. शेवटून १० वा क्रमांक आल्याने महापालिकेवर टीका झाली होती. २०१७ मध्ये ७७ शहरांऐवजी ४०० शहरांमधून हे सर्वेक्षण घेतले गेले. त्यावेळी महापालिकेचा २३४ वा क्रमांक आला होता. त्यामुळे कल्याण-डोंबिवली ही अस्वच्छ शहरे आहेत, असा शिक्का या शहरांवर बसला होता.
कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प न उभारल्याने केडीएमसीचा २०१६ व २०१७ च्या स्वच्छ सर्वेक्षणात नंबर घसरला होता. तसेच जैव वैद्यकीय प्रकल्प सुरू झालेले नव्हता. आधारवाडी डम्पिंगचा प्रश्नही गाजत होता. त्यामुळे महापालिकेस गुण कमी मिळाले. त्यानंतर महापालिकेने उंबर्डे व बारावे येथे घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा काढून ती मंजूर केली. तसेच आधारवाडी डम्पिंगवरील कचरा प्रक्रियेसाठी सयंत्रणा सुरू केली. त्यामुळे बºयापैकी सकारात्मक कृती होत असल्याचे सर्वेक्षण समितीच्या नजरेस आले.
या वेळच्या सर्वेक्षणाची नियमावलीही बदली होती. यंदाच्या सर्वेक्षणात ३५ टक्के गुण फिडबॅकला होते. ३५ टक्के गुण सर्वेक्षण करणाºया व्यक्तींकडून दिले जाणार होते. तसेच ३० टक्के गुण हे महापालिकेचे प्रयत्न काय आहेत, याला होते. एका अ‍ॅप्सद्वारे फिडबॅक घेतला गेला. कचºयाचा फोटो टाकून तो कळविला जात होता. त्याठिकाणी स्वच्छता केली जात होती. फिडबॅक चांगला मिळाल्याने गुणही वाढले. त्यामुळे शंभरच्या यादीत महापालिकेचा समावेश झाला आहे. यंदा चालू वर्षी पुन्हा नव्याने मार्गदर्शक नियमावली येऊ शकते. त्यासाठी महापालिका तयार आहे. नव्या सर्वेक्षणात पहिल्या पन्नासमध्ये महापालिका येण्यासाठी प्रयत्न करेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केला आहे.

Web Title: KDMC 97th in clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.