शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

कपिल पाटील यांची ३ कोटींची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:06 AM

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम करावे, यासाठी मला त्यांनी तीन कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी रात्री खळबळ उडवून दिली.

पडघा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम करावे, यासाठी मला त्यांनी तीन कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी रात्री खळबळ उडवून दिली. ही आॅफर धुडकावून युतीधर्म म्हणूनच माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी पाटील यांचे काम केले. आमच्यामुळेच ते खासदार झाले, पण आता ते मग्रुरीने वागत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झालेल्या कपिल पाटील यांचे राजकारण मग्रुरीचे आहे. शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचा आरोपही प्रकाश पाटील यांनी केला. म्हणूनच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, मनसे आणि रिपब्लिकन (से.) असे पक्ष एकत्र आले असून जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष हा या महाआघाडीचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादीचे विविध नेते उपस्थित होते.