कल्याण : प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या दुकानदाराला न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:02 IST2019-01-15T19:01:39+5:302019-01-15T19:02:19+5:30
फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदार धनंजय कुलकर्णी (वय 49 वर्ष) याला कल्याण गुन्हे शाखेने सोमवारी (14 जानेवारी)अटक करत त्याच्या दुकानातून १७० शस्त्रास्त्रे हस्तगत केली.

कल्याण : प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या दुकानदाराला न्यायालयीन कोठडी
डोंबिवली : फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदार धनंजय कुलकर्णी (वय 49 वर्ष) याला कल्याण गुन्हे शाखेने सोमवारी (14 जानेवारी)अटक करत त्याच्या दुकानातून १७० शस्त्रास्त्रे हस्तगत केली. कल्याण न्यायालयाने मंगळवारी धनंजयला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दुकानात धाड टाकली. रात्रभर दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे.