कल्याण : पेट्रोल भरण्याच्या वादातून तरुणांची पंपावरील कर्मचा-याला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 22:11 IST2017-12-23T22:06:30+5:302017-12-23T22:11:17+5:30
पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कल्याणमधील ही घटना आहे.

कल्याण : पेट्रोल भरण्याच्या वादातून तरुणांची पंपावरील कर्मचा-याला बेदम मारहाण
कल्याण - पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. शनिवारी (23 डिसेंबर) कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरातील पेट्रोल पंपावरील ही घटना घडली आहे. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीचा हा प्रकार फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
बैलबाजार येथील हिंद पेट्रोलपंपावर एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला. पेट्रोल भरत असताना त्याचा योगेश भोसले या कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. हा वाद सुरु असतानाच त्या ठिकाणी दोन मोटारसायकल घेऊन अजून काही तरुण आपल्यासोबत बॅट घेऊन आले. या सर्वांनी मिळून कर्मचारी योगेश भोसले याला मारहाण केली आणि आपल्या गाड्यांमध्ये जबरदस्तीने पेट्रोल भरून तेथून पोबारा केला. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य दिसत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.