शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : शिवाजी महाराजांचा बॅनर काढल्यानं भाजपाचा नगरसेवक वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 18:39 IST

कल्याण-टिटवाळा येथील गोवेल चौकात शिवजयंतीनिमित्त राज ग्रुप संस्थेच्या वतीनं शिवाजी महाराजांचा बॅनर लावण्यात आला होता.

कल्याण - कल्याण-टिटवाळा येथील गोवेल चौकात शिवजयंतीनिमित्त राज ग्रुप संस्थेच्या वतीनं शिवाजी महाराजांचा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर उल्हासनगरचे नगरसेवक राजेश वधारीया यांच्या माणसांनी काढला. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यानंतर राजे ग्रुपने वधारीया यांच्या कृत्याचा निषेध करत टिटवाळा बंद पुकाराला आहे. ''जिथे शिवजयंतीचा बॅनर लावला होता. ती जागा जाहिरातीसाठी वधारीया यांच्या जाहिरात कंपनीकडे आहे. वधारीया यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल'', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) रात्री ९ वाजता छिंदमला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला १ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. के. एम. कोठुळे यांनी छिंदमच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी छिंदम याच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी कोणी वकिल नव्हता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान छिंदम याला सबजेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे छिंदमला कैद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छिंदम याची लवकरच नगर बाहेर रवानगी होणार असल्याचे समजते.

दरम्यान, शनिवारी सकाळी 9 वाजता अहमदनगरच्या सबजेलमध्ये छिंदमला दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नसला तरी सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे पत्र न्यायालयाला दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छिंदम याला सबजेलमधून हलवावे, असे पत्र सबजेल प्रशासनाने न्यायालयाला दिले आहे. निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

टॅग्स :BJPभाजपा