Mumbai Train Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:41 IST2019-01-03T13:25:50+5:302019-01-03T13:41:19+5:30
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Mumbai Train Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
कल्याण - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आसनगाव आणि आटगाव रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं कसाऱ्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या बिघाडामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यादेखील रखडल्या आहेत.
दुपारी 12.35 वाजता मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. वासिंद, आसनगाव स्थानकात उत्तर भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आसनगाव येथून इंजिन पाठवण्यात आल्याची माहिती प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी दिली. दरम्यान, बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी अर्धा तास लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, आसनगाव-आटगाव रेल्वे स्थानकादरम्यान बिघाड #CentralRailway#Local
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 3, 2019
(Mumbai Train Update: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत)
यापूर्वी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागता होता. बुधवारी (2 जानेवारी) ऐन गर्दीच्या वेळी दोन वेळा मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
यानंतर, ठाणे आणि मुलुंड स्टेशनदरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. तांत्रिक बिघाड आणि रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागल होता.