मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,कल्याण-कसारादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 09:16 IST2018-12-08T09:07:27+5:302018-12-08T09:16:45+5:30
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,कल्याण-कसारादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं
ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट झाला फेल कल्याण-कसारा मार्गादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं
कल्याण -मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे कल्याण-कसारा मार्गादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं सुरू आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त झालेला असताना वाहतूक सेवा पुरती कोलमडली आहे. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
(लोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत)
कल्याण : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यानं वाहतूक कोलमडली @Central_Railway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 8, 2018