शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-मुंब्रा, दिवावासीयांना मिळणार अखंडित वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 01:11 IST

कळवा आणि मुंब्रा-दिवावासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागते.

ठाणे : कळवा आणि मुंब्रा-दिवावासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून या भागात आता टोरंटमार्फत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला काही स्थानिक नेत्यांचा विरोध असला तरीसुद्धा भिवंडीत यशस्वी झालेला टोरंटचा फॉर्म्युला या भागातही यशस्वी करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज झाली आहे. कळवा आणि मुंब्रा, दिवा विभागात भिवंडीसारखीच यंत्रणा राबवून अखंड वीजपुरवठा तोही महावितरणच्या दरानुसारच करण्याची ग्वाही टोरंट पॉवर कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे राजकीय मंडळींचेही अवसान गळाले आहे.मागील काही महिन्यांपासून टोरंट हटावसाठी नारा दिला जात आहे. यामध्ये राजकीय मंडळींनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली आहेत. परंतु,त्यानंतरही राज्य शासनाने टोरंटला या भागात परवानगी दिली असून त्यांचे कार्यालयसुद्धा सुरू झाले आहे. या यंत्रणेमुळे या भागातील वीजचोरी, विजेची तूट यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान होत होते. त्यामुळेच राज्य शासनाने येथील विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. वीजवितरण आणि वीजबिलवसुलीचे कंत्राट निविदा सूचनेद्वारे देण्याचे जाहीर केले. त्यानुसार हे कंत्राट टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला दिले.>भिवंडीतील तूट ६० वरून १५ टक्क्यांवर१२ वर्षांपूर्वी भिवंडीत एमएसईबीची वीजतूट ६० टक्क्यांवर होती. आज हे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे. आजपर्यंत टोरंटने नेटवर्क आणि सुविधांसाठी ६०० कोटी रु पयांची गुंतवणूक भिवंडीत केली आहे. भिवंडी शहर एमईआरसीच्या गुणांमध्ये ड श्रेणीमध्ये होते, ते आता ब श्रेणीमध्ये आले आहे. भिवंडीत जी पूर्वी परिस्थिती होती, ती आता कळवा, मुंब्रा, दिवा विभागांत आहे. खाजगीकरणानंतर अतिशय नियोजनबद्धपणे अखंडित वीज देण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे.