शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

कलानींचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला? कुटुंबासोबत NCP नेत्यांची बंद दाराआड "भोजनपे" चर्चा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:25 IST

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह अन्य नेत्यांचे कलानी महलमध्ये भोजन...! मध्यरात्रीच्या साडे तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते कलानी महलमध्ये उपस्थित होते.

सदानंद नाईक -

उल्हासनगर - राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेत्यांनी कलानी कुटुंबाशी बंद दराआड संवाद साधल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, ही भेट पक्षाच्या माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांच्या स्मरणार्थ घेतली असल्याचे ओमी कलानी यांनी म्हटले आहे. ओमी टीम स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथील सभागृहात शनिवारी रात्री राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी, गटनेते व सभागृह नेते भारत गंगोत्री आदींनी पक्षाचा कार्यक्रम यशस्वी केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाचे व सोनिया धामी व गंगोत्री यांचे कार्यक्रमात कौतुक केले. कार्यक्रमानंतर शहराध्यक्षा सोनिया धामी यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांसाठी अल्पोहार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी कलानी महल गाठले. कलानी महलमध्ये सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 

मध्यरात्रीच्या साडे तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते कलानी महलमध्ये उपस्थित होते. यावेळी कलानी कुटुंबासोबत बंद दराआड नेत्यांनी बैठक घेतली. बैठकीत पप्पु कलानीही उपस्थित होते, असे बोलले जात आहे. 

महापालिका निवडणुकीपूर्वी कलानी कुटुंबाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल. अशी चर्चा शहरात रंगली आहे. शहरात कलानी कुटुंबाचा राष्ट्रवादी पक्षासोबत दुरावा निर्माण झाल्यावर, पक्षाची सूत्र भारत गंगोत्री यांच्याकडे गेली. गंगोत्री यांनी महापालिका सत्तेत शिवसेनेसोबत राहून सभागृहनेते पद मिळवून पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम राबविले. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली होती. तसेच त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तसेच मीना आयलानी या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. महापालिका निवडणुकीत पक्षाचे ४ नगरसेवक गंगोत्री यांच्या मुळे निवडून आणून पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले. 

जितेंद्र आव्हाड यांना गणेश नाईक प्रकरणी टोमणा!नवीमुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनीं पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. तेंव्हा पक्षासोबत गणेश नाईक हे विश्वासा घात करतील, यासंदर्भात पक्ष नेतृत्वाला माहिती दिली होती. या वाक्याची आठवण शहर जिल्हाध्यक्ष सोनिया धामी यांनी परिवार संवाद कार्यक्रमात कलानी कुटुंबाचे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना करून दिली. आव्हाड साहेब यांच्या सारखी अवस्था आमची झाल्याचे धामी यांचे म्हणणे होते. यानंतर पक्षाच्या नेत्यांनी कलानी महल येथे भोजन केल्याची टीका होत आहे. तर कलानी कुटुंबाला आपला विरोध कायम असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री यांनी दिली आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस