उल्हासनगरात विकास कामाबाबत बैठकीचे सत्र आयुक्त व आमदारा मध्ये संयुक्त बैठक
By सदानंद नाईक | Updated: November 16, 2022 17:45 IST2022-11-16T17:44:54+5:302022-11-16T17:45:18+5:30
महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन विकास कामाचा आढावा घेतला. मात्र विकास कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.

उल्हासनगरात विकास कामाबाबत बैठकीचे सत्र आयुक्त व आमदारा मध्ये संयुक्त बैठक
उल्हासनगर : शहरातील परिवहन बस सेवा, डम्पिंग, रस्ते, पाणी आदी विकास कामा बाबत आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांनी आयुक्त अजीज शेख यांच्यासह अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी शहरात राबविण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन नवीन कामाच्या प्रस्तावाला चर्चा झाली.
उल्हासनगरात पाणी समस्या, रस्त्याची दुरावस्था, डम्पिंग ग्राऊंड, ठप्प पडलेली परिवहन बस सेवा, अमृत योजने अंतर्गत विकास कामे आदींचा आढावा घेण्यासाठी महापालिका सभागृहात आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांनी बैठक घेतली.
आमदार आयलानी व गायकवाड यांनी शहरातील विकास कामाबाबत आढावा घेऊन त्यांना गती देण्याचे यावेळी आयुक्त अजीज शेख यांना सांगितले. तसेच केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या सोबत यापूर्वी झालेल्या बैठकीत ज्या विकास कामा बाबत चर्चा झाली. त्या विकास कामाचे प्रस्ताव बनविले का? आदींची विचारणा झाली. गेल्याच महिन्यात आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहर विकास कामाची यादी दिली होती. तर गेल्या आठवड्यात डीपीसीडी बैठकीत शहातील विकास कामा बाबत यादी देऊन महापालिका मुख्यालय इमारत धोकादायक असल्याचे सांगून विशेष निधीची मागणी केली होती. त्या पाठोपाठ महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन विकास कामाचा आढावा घेतला. मात्र विकास कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.