शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जेलभरो

By admin | Updated: September 14, 2015 03:56 IST

धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा

कल्याण : धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बिकट बनला असून याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करून रविवारी डोंबिवलीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानपाडा, चाररस्ता येथे जेलभरो आंदोलन छेडले. धोकादायक इमारतींसाठी गृहनिर्माण योजना, सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे भाडेवसुली रोखणे, महापालिकांच्या रुग्णालयांची अवस्था सुधारणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात रस्त्यावर ठिय्या मांडला गेल्याने वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आंदोलनकर्त्यांना रामनगर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. इतर शहरांप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.याबाबत, वारंवार विनंती अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. १ डिसेंबर २०१४ आणि २१ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही याकडे लक्ष वेधले होते. यावर तातडीने तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ठोस कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)