संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 22:16 IST2025-08-16T22:15:09+5:302025-08-16T22:16:17+5:30
जय जवान ने आज सकाळी मुंबई देखील त्यांनी दहा थरांचा विश्वविक्रम केला. दुपारी ठाणे शहरात दाखल होणारे जय जवानला वाहतूक कोंडीमुळे उशिराने दाखल झाले.

संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
ठाणे : दुपारी जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थरांचा विक्रम केल्यानंतर संध्याकाळी ठाण्यामध्ये आलेल्या जय जवान ने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थरांची सलामी दिली.
जय जवान ने आज सकाळी मुंबई देखील त्यांनी दहा थरांचा विश्वविक्रम केला. दुपारी ठाणे शहरात दाखल होणारे जय जवानला वाहतूक कोंडीमुळे उशिराने दाखल झाले. सायंकाळी ठाणे शहरात आल्यानंतर त्यांनी पहिली हजेरी संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये लावली. त्यांनी दहा थर रचून त्यांनी सलामी दिली. मात्र दहावा थराचा गोविंदा सलामी द्यायला उभा राहायला आणि काही सेकंदामी थर कोसळला. त्यामुळे दहा थर लागले की नाही हे पुन्हा पाहण्यात आले.
यावेळी जय जवान चे दहा थर लागले की नाही याचा निर्णय पूर्वेश सरनाईक यांनी स्पेन वरून आलेले प्रसिद्ध कॅसलर टोनी आणि एना यांना निर्णय घेण्यासाठी सांगण्यात आलं. व्हिडिओ स्लो करून पाहिल्यानंतर जय जवान चा दहावा थर लागला असल्याचे त्यांनी घोषित करण्यात आलं. यावेळी जय जवान ने एकच जल्लोष केला. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले की, हे गोविंदा पथक माझा आहे आणि त्यांनी मला मोठं केलं आहे.