्र्परमबीर सिंग यांच्यासह सर्व आरोपींवर लूक आऊट नोटीस जारी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:06 PM2021-08-03T21:06:26+5:302021-08-03T21:09:52+5:30

गंभीर स्वरुपाची कलमे असलेला गुन्हा दाखल असल्याने पोलीसही या प्रकरणात जपून पावले टाकत आहेत. यात आधी पुरावे गोळा करुन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Issue look-out notices to all the accused, including Pranabbir Singh | ्र्परमबीर सिंग यांच्यासह सर्व आरोपींवर लूक आऊट नोटीस जारी करा

पोलिसांकडून पुरावे गाळा करण्याचे काम सुरु

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून पुरावे गाळा करण्याचे काम सुरुसाक्षीदारांचे जबाबही नोंदविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह सर्व २८ आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे मंगळवारी केली आहे.
सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदी असलेल्या परमबीर सिंग हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी असतांना त्यांच्यासह तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीश शर्मा, राजकुमार कोथमिरे तसेच ठाणे महापालिकेचे ठेकेदार विकास दाभाडे आदी २८ जणांनी सोनू आणि केतन यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडोंची खंडणी उकळल्याची फिर्याद ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याच गुन्हयात परमबीर यांच्यासह इतरही आरोपी हे परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त करीत सोनू आणि केतन यांनी त्यांना परदेशात पळून न जाण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे तसेच ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्याकडे केली आहे. गंभीर स्वरुपाची कलमे असलेला गुन्हा दाखल असल्याने पोलीसही या प्रकरणात जपून पावले टाकत आहेत. यात आधी पुरावे गोळा करुन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Issue look-out notices to all the accused, including Pranabbir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.