हे कोरोना नियमांचे उल्लंघन नाही का? कळव्यातील उदघाटन सोहळ्यावरून मनसेचा महाविकासआघाडीला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 20:55 IST2022-01-15T20:54:24+5:302022-01-15T20:55:07+5:30
Thane News: खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाच्या कार्यक्रमा दरम्यान मोठया संख्येने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. या कार्यक्रमावर मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आाहे.

हे कोरोना नियमांचे उल्लंघन नाही का? कळव्यातील उदघाटन सोहळ्यावरून मनसेचा महाविकासआघाडीला सवाल
कल्याण - खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाच्या कार्यक्रमा दरम्यान मोठया संख्येने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. या कार्यक्रमावर मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आाहे. तुमचेच मंत्री व पालिका आयुक्त जर असे करणार असतील तर नागरीक काय करणार नियम फक्त नागरीकांनाच लागू आहेत का एकदा कोरोना हा फ्लू आहे असे जाहीर करा. लोकांना मोकळे तरी करा असे ट्वीट मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. कोविडची तिसरी लाट सुरु असताना दोन मंत्र्यांच्या उपस्थित इतकी गर्दी जमा झालेत हा खरंच आश्चर्याचा विषय आहे.
कळवा पूर्व पश्चिमेला जोडणा-या खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाचे लोकार्पण कार्यक्रम आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापालिका अधिका-यांच्या उपस्थीत पार पडला. या वेळी पूलाच्या श्रेयवादाची लढाई जोरदार रंगली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने होते. तिसरी लाट सुरु आहे. सरकारकडून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी नवे नियम लावले जात आहेत. नियमाची सक्तीने अंमलबजावणी करण्याकरीता पोलिस आणि अधिकारी जोमाने काम करीत आहेत. असे असताना पूलाच्या लोकार्पण कार्यक्रमात नागरीक आणि कार्यकत्र्याची गर्दी म्हणजे कोरोना आमंत्रण देणारी होती.
सरकारमधील जबाबदार मंत्री असे करत असतील तर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमा दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी करु नका असे आवाहन केले. तरी देखील गर्दी हटली नव्हती. या मुद्यावर मनसे आमदारपाटील यांनी सरकारले घेरले आहे. दोन्ही आयुक्तांसह सरकारवर निशाणा साधला आहे.