टीडीसी बँकेच्या उल्हासनगर शाखेला अखेर लोखंडी जिना
By Admin | Updated: August 18, 2015 00:31 IST2015-08-18T00:31:50+5:302015-08-18T00:31:50+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसी बँक) उल्हासनगर -३ येथील शाखा नव्या इमारतीत स्थलांतरीत झालेली आहे. पण या बँकेत येणाऱ्या महिला व अन्य

टीडीसी बँकेच्या उल्हासनगर शाखेला अखेर लोखंडी जिना
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसी बँक) उल्हासनगर -३ येथील शाखा नव्या इमारतीत स्थलांतरीत झालेली आहे. पण या बँकेत येणाऱ्या महिला व अन्य खातेदारांनी बँकेतून काढलेली रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी या इमारतीच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित नव्हता. त्यासाठी व्यवस्थापनास जागे करण्यासाठी लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन अखेर या बँकेत लोखंडी जिना तयार करण्यात आला आहे.
शिक्षकांचे वेतन, मुलींची शिष्यवृत्ती, यामुळे शिक्षिका, विद्यार्थी यांच्यासह खातेदार महिलांची या बँकेत दुपारी तीन वाजेपर्यंत सतत ये-जा सुरू असते. त्यांना या सुनसान भागातील लोकांच्या किळसवाण्या नजरांना सामोरे जावे लागते. यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असूनही सुरक्षेच्या दृष्टीने एकही उपाययोजना बँकेने केलेली नव्हती.
याकडे बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले असता तेथील महिला मॅनेजरनेही त्याचा सातत्याने पाठपुरावा करून रहदारीच्या बाजूने दुसऱ्या मजल्यापर्यंत लोखंडी जीना तयार केल्याचे सांगितले. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पण या ठिकाणाहून मोठी गटार गेले असून त्यावर स्लॅब टाकलेला आहे. त्याचे मोठे चेंबर मात्र उघडे असल्याने त्यात एखाद्याचा पाय घसरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याबाबतही बँकेने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता बँकेच्या खातेदारांनी स्पष्ट केली आहे. (प्रतिनिधी)