शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

करोडोंची फसवणूक करणा-या मैत्रेय घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:45 IST

पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

 ठाणे  - पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. यात फसवणूक झालेल्या जिह्यातील २० गुंतवणूकदारांसह केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी गुरुवारी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविला.मैत्रेय ग्रुप मार्केटींग कंपनीने पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने तसेच या ग्रुपमधील विविध उद्योग समुहाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक दलालांचे जाळे तयार करून त्यांच्या मदतीने प्रामुख्याने महिला, कामगार आणि शेतमजूरांकडून या दलालांनी दरमहा पैसे घेतले. नवी मुंबईतील सरस्वती मरतूर यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार २००६ मध्ये त्यांनी या मैत्रेय उद्योग समुहामध्ये एका महिला दलालामार्फत पैसे गुंतविले. दरमला ६०० प्रमाणे ७८ महिन्यांसाठी ७२ हजार रुपये बोनससह मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. २०१३ च्या सुरुवातीला त्यांना ही रक्कमही मिळाल्याने त्यांचा या योजनेवर चांगल्या प्रकारे विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याच शेजारी राहणाºया अनिता हल्लाळे यांनी या योजनेत पैसे गुंतविण्यास त्यांना भाग पाडले. नव्या योजनेनुसार जमिनीमध्ये प्लॉटींग करुन ते विकसित करुन त्यामध्ये बांधकाम करुन भविष्यात त्यांची विक्री करून त्यातून मिळणाºया नफ्याचे वाटप हे गुंतवणूकदाराने केलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात येते किंवा गुंतवणूकदारास त्याने योजनेंतर्गत केलेल्या गुंतवणूकीवर प्लॉट देते, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी १२ हजार ६०० प्रमाणे सहा वर्षांसाठी भरल्यावर एक लाख १२ हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, कालांतराने ही रक्कम मागण्यास त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.मरतूर यांच्याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतील अनेक कामगार, महिलांनी या योजनेत पैसे गुंतविले. पैसे दुप्पट करण्याच्या अपेक्षेने अनेकांनी यात गुंतवणूक केली. मात्र, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड येथील शेकडो गुंतवणूकदारांकडून १० ते १५ कोटींच्या रकमा स्वीकारुन त्यांचा अपहार करुन मैत्रेच्या संचालकांनी पळ काढला. यातील अनेक गुंतवणूकदारांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली. तेंव्हा त्यांनी मैत्रेय गुं्रपच्या मधूसुदन सत्पाळकर याच्यासह सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली.कंपनीने विविध प्रलोभने दाखवून कोटयवधी रुपये गोळा केले. त्याचा परतावा मात्र दिलाच नाही. सुमारे ६०० गोरगरीबांची यात फसवणूक झाली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यातील आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा, असे केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा