करोडोंची फसवणूक करणा-या मैत्रेय घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:45 PM2017-09-28T22:45:25+5:302017-09-28T22:45:41+5:30

पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

 Investigations on the Maitreya scam that have been fraudulent of crores of rupees are investigated by the Economic Offenses Wing | करोडोंची फसवणूक करणा-या मैत्रेय घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

करोडोंची फसवणूक करणा-या मैत्रेय घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

 ठाणे  - पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. यात फसवणूक झालेल्या जिह्यातील २० गुंतवणूकदारांसह केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी गुरुवारी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविला.
मैत्रेय ग्रुप मार्केटींग कंपनीने पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने तसेच या ग्रुपमधील विविध उद्योग समुहाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक दलालांचे जाळे तयार करून त्यांच्या मदतीने प्रामुख्याने महिला, कामगार आणि शेतमजूरांकडून या दलालांनी दरमहा पैसे घेतले. नवी मुंबईतील सरस्वती मरतूर यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार २००६ मध्ये त्यांनी या मैत्रेय उद्योग समुहामध्ये एका महिला दलालामार्फत पैसे गुंतविले. दरमला ६०० प्रमाणे ७८ महिन्यांसाठी ७२ हजार रुपये बोनससह मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. २०१३ च्या सुरुवातीला त्यांना ही रक्कमही मिळाल्याने त्यांचा या योजनेवर चांगल्या प्रकारे विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याच शेजारी राहणाºया अनिता हल्लाळे यांनी या योजनेत पैसे गुंतविण्यास त्यांना भाग पाडले. नव्या योजनेनुसार जमिनीमध्ये प्लॉटींग करुन ते विकसित करुन त्यामध्ये बांधकाम करुन भविष्यात त्यांची विक्री करून त्यातून मिळणाºया नफ्याचे वाटप हे गुंतवणूकदाराने केलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात येते किंवा गुंतवणूकदारास त्याने योजनेंतर्गत केलेल्या गुंतवणूकीवर प्लॉट देते, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी १२ हजार ६०० प्रमाणे सहा वर्षांसाठी भरल्यावर एक लाख १२ हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, कालांतराने ही रक्कम मागण्यास त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
मरतूर यांच्याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतील अनेक कामगार, महिलांनी या योजनेत पैसे गुंतविले. पैसे दुप्पट करण्याच्या अपेक्षेने अनेकांनी यात गुंतवणूक केली. मात्र, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड येथील शेकडो गुंतवणूकदारांकडून १० ते १५ कोटींच्या रकमा स्वीकारुन त्यांचा अपहार करुन मैत्रेच्या संचालकांनी पळ काढला. यातील अनेक गुंतवणूकदारांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली. तेंव्हा त्यांनी मैत्रेय गुं्रपच्या मधूसुदन सत्पाळकर याच्यासह सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली.
कंपनीने विविध प्रलोभने दाखवून कोटयवधी रुपये गोळा केले. त्याचा परतावा मात्र दिलाच नाही. सुमारे ६०० गोरगरीबांची यात फसवणूक झाली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यातील आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा, असे केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title:  Investigations on the Maitreya scam that have been fraudulent of crores of rupees are investigated by the Economic Offenses Wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा