शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

केंबुर्ली मृतदेहप्रकरणी तपास प्रगती शून्य  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:15 IST

गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेकडे लागले असतानाच केंबुर्ली गाव हद्दीत डोंगरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता.

दासगाव : गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेकडे लागले असतानाच केंबुर्ली गाव हद्दीत डोंगरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता. याचा तपास सुरुवातीपासूनच वरिष्ठ अधिकाºयांकडे गेला. वरिष्ठ अधिकारी पातळीवरून तपास चालू असून देखील वर्षभरापासून या मृतदेहाचे गूढ कायम आहे. पेणनजीकच्या जंगलात मृतदेह तपासानंतर हायप्रोफाईल शीना बोरा प्रकरण प्रकाशात आले. या प्रकरणाची दखल घेत केंबुर्ली येथील प्रकरणात तपास गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.२०१६ आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाडमध्ये सावित्री पूल दुर्घटनेतील मृतदेह शोधण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सावित्री नदी खाडीमध्ये मृतदेह अगर तशा प्रकारची कोणतीही वस्तू पाण्यात सापडल्याचे कानी पडताच स्थानिक नागरिक पोलीस बचाव पथकाचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता पोहचत होते. याच दरम्यान ११ आॅगस्ट रोजी सकाळी महाड तालुक्यातील कें बुर्ली गाव हद्दीत मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना आला. कोणतीही सविस्तर माहिती मिळाली नसल्याने हा मृतदेह पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. अज्ञात आणि ओळखीचे पुरावे नसलेल्या या मृतदेहाचा तपास पोलीस तपासाच्या नियमाप्रमाणे वरिष्ठ अधिकाºयांकडे सोपविण्यात आला. महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांनी या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या गावापासून ते जिल्हा तसेच परजिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तीबाबत माहिती उपलब्ध करून तपास सुरु झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील महत्त्वाचा अंदाजे चेहºयाचे छायाचित्र पोलिसांना उपलब्ध झाले. अशा वेगवेगळ्या पातळीवर तपासाचे काम सुरू असताना देखील तपासाला अद्याप यश आलेले नाही. सदरचा मृत व्यक्ती स्थानिक होता की बाहेरचा, या व्यक्तीचा खून बाहेर झाला की घटनास्थळी त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली, अशी एकना अनेक प्रश्न वर्षभराच्या तपासानंतर आजही अनुत्तरित आहेत.पेणमध्ये अशाच प्रकारे बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरण उघडकीस आले होते. रायगड जिल्ह्यातील पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता अक्षरश: दडपले होते. सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास करून हायप्रोफाईल आरोपींना अटक केली. आज हे प्रकरण निर्णयाप्रत पोहचले आहे. त्याच प्रकारची काहीशी परिस्थिती केंबुर्लीमधील या मृतदेहाबाबत दिसून येत आहे. या प्रकरणात आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावताना कोणतेही पुरावे मागे ठेवले नाही.केंबुर्ली मृतदेह प्रकरणी तपास सुरू आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम बनवून स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत तपासाची सूत्रे हलवली जात आहे. कोणताही ठोस पुरावा नसल्याने ओळख पटणे अशक्य झाले आहे.-प्रांजली सोनावणे,उपविभागीय पोलीस अधिकारी, महाडहे प्रकरण हायप्रोफाईल असल्याचे माहीत नाही तरी खून करणाºयांनी मृतदेहाची विल्हेवाट लावताना कोणतेही पुरावे ठेवले नाही. मुख्य रस्त्यापासून जवळची मात्र निर्जन जागा विल्हेवाट लावण्यासाठी वापरली. आज पोलिसांच्या हाती या मृतदेहाच्या पायातील बुटाचा काही भाग हा एकमेव पुरावा म्हणून आहे. त्यावरच तपासाची भिस्त कायम आहे.महाडमधील स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास लावण्यात अपयशी ठरल्यानंतर तरी पोलीस वरिष्ठ अधिकाºयांनी हे प्रकरण आता कोणत्यातरी वेगळ्या तपास यंत्रणेकडे वर्ग करणे गरजेचे आहे.