शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 06:57 IST

अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली.

ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा  एन्काउंटर केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला. फटाक्यांना  घाबरणारा अक्षय पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करूच शकत नाही, असा दावा त्याच्या काकांनी केला, तर अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली.

नवी मुंबईतील तळाेजा कारागृहात आराेपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील साेमवारी सकाळी गेले हाेते. मुलाला भेटण्याचे टाेकन त्यांना  मिळाले नव्हते. त्यांना दुपारी ३.३० वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण ३.४५ वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि त्याच्या आई-वडिलांची २० मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर अवघ्या दाेन तासांनंतर त्याच्या एन्काउंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली. कारागृहातील भेटीमध्ये माझ्यावरील चार्जशीट दाखल झाली. मला कधी साेडविणार? अशी विचारणा त्याने केली. त्याच्या भेटीनंतर ४.४५ वाजता बाहेर पडल्यानंतर पाेलिस चकमकीत ताे मारला गेल्याचे समजले. परंतु, पाेलिसांनी अधिकृतरीत्या काहीच कळवले नाही. या प्रकरणातील सहाजण फरार आहेत. अक्षयवरील गुन्हा सिद्ध झाला नव्हता. म्हणूनच त्याला मारले, असा आराेपही त्याच्या काकांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्याच्या काकांनी केली. 

माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवालही त्याच्या आईने केला. 

बदलापुरात आंदोलन उभ्या करणाऱ्या मनसेच्या संगीता चेंदवाकर, भाजपच्या मीनल मोरे, शिंदेसेनेच्या पूजा टाकसाळकर आणि अजित पवार गटाच्या प्रियंका दामले यांनी नगरपालिका कार्यालयासमोर एकत्र येत एकमेकांना पेढे भरवले.

बदलापूरमध्ये जल्लोष

अक्षय शिंदे याचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाल्याचे समजल्यावर बदलापूरमध्ये फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शिंदेला तातडीने फाशी देण्याची मागणी बदलापूरमधील नागरिकांनी केली होती.

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस