सदानंद नाईकउल्हासनगर : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या ६८ कोटीच्या निधीतील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामाला निवडणुकीत दरम्यान मुहूर्त लागला. मात्र मुख्य रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्त्याच्या गुणवत्तावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून विभागाने मात्र रस्त्याची डिझाईन व्हीजेटीआय संस्थेकडून मंजूर केल्याची माहिती दिली.
उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाल्यावर, रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने एकूण ४ टप्प्यात ६८ कोटींचा निधी दिला. मात्र दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी पडून होता. शहरांत भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकल्यानंतर रस्ता बांधणीला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांनी यापूर्वी दिली होती. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते रस्ते भूमिपूजन झाल्यावर रस्ता बांधणीचे काम सुरुवात झाली. मात्र रस्ता खोदून बांधण्यात ऐवजी जुन्याच रस्त्यावर एका फुटाचा आरसीसी रस्ता बांधण्याचे काम सुरु झाले. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, भविष्यात रस्त्याचे काम निकृष्ट होणार असल्याची भीती स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आदिनी व्यक्त केली.
तब्बल ६८ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणारा रस्ता खोदून न बांधता रस्त्यावर रस्ता बांधला जात आहे. याबाबत सार्वजनिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांना विचारले असता, रस्ताचे काम सुरु झाले. पावसाळापूर्वी रस्त्याचे पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रस्त्यावर रस्ता बांधण्याचे डिझाईन व्हीजेटीआयकडून मंजूर केल्याची माहिती मानकर यांनी दिली. रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्ता ऐक फूट उंच झाला. त्यामुळे रस्त्या लगतची अनेक दुकानें रस्त्या खाली गेली. पावसाळ्यात दुकानात पाणी घुसण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी नाल्या बनविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची उंची कमी असल्याने, रस्त्यात पाणी साचते. असी माहिती मानकर यांनी दिली. एकूणच ६८ कोटीच्या निधीतून बांधन्यात येणाऱ्या रस्त्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. याबाबत चौकशीची मागणी शहरातून होत आहे.