शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाहनचालकांवर इंटरसेक्टर व्हेइकलची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:52 AM

सहपोलीस आयुक्तांनी दाखविला हिरवा झेंडा : तीन किलोमीटरवरूनच काढणार वाहनाच्या वेगाचा फोटो

ठाणे : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमेऱ्यासह दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांना ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी हिरवा झेंडा दाखवून ती ठाणे पोलिसांच्या सेवेत सोमवारी दाखल केली.

राज्यभरातील पोलिसांसाठी दिल्लीतील एका खासगी कंपनीने तंत्रज्ञान विकसित केलेली ९६ वाहने गृहविभागाने दिली आहेत. त्यातील इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा अशी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली दोन वाहने ही ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आली आहे. या वाहनांच्या इंजीनची मेकला तसेच पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

भारतीय बनावटीच्या सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान या वाहनांमध्ये असून त्याद्वारे विनाहेल्मेट जाणारे दुचाकीस्वार, कारमधून सीट बेल्ट न लावणारे चालक, महामार्गावर भरधाव वेगाने जाणारे वाहनचालक या सर्वांवर या वाहनांद्वारे ठाणे पोलिसांची यापुढे करडी नजर राहणार आहे. याशिवाय, वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावणारे, वाहनांना काळी फिल्म लावणारे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांना पोलिसांचा हा कॅमेरा अचूक टिपणार आहे. शिवाय, कोणताही वाद न घालता वाहनावरील क्रमांकाच्या आधारे स्वयंचलित यंत्रणेद्वारे ई-चलनाच्या दंडाची पावतीही संबंधित वाहनचालकाच्या मोबाइलवर पाठविली जाणार आहे. याच वाहनांमध्ये ब्रिथ अ‍ॅनालायझरची यंत्रणाही बसविण्यात आली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्यप्राशन केले, याचा अहवालही तत्काळ या यंत्रणेद्वारे मिळणार आहे. यापूर्वीच्या ब्रिथ अ‍ॅनालायझरमध्ये फोटो काढण्याची सुविधा नव्हती. आता मात्र फोटोसह मद्यपीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांनाही चांगलाच चाप बसणार आहे. या अत्याधुनिक वाहनांचा वाहतूक शाखेत समावेश झाल्याने वाहतूक नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई करणे सुलभ होणार असल्याचे मेकला यावेळी म्हणाले.या वाहनांमधील स्पीड गनमुळे तीन किलोमीटर अंतरावरील वाहनांचाही अचूक वेग मोजता येणार आहे. शिवाय, एकाच कॅमेºयातून वेगवेगळ्या वाहनांचा स्पीड टिपला जाणार आहे. महामार्गावर दुचाकीला प्रतितास ४० किमी, कारसाठी ८० तर अवजड वाहनांना ६० किमीची वेगमर्यादा असेल, तर संबंधित वाहनांच्या वेगाप्रमाणेच या स्पीड गनकडून तशी दंडात्मक कारवाई ई-चलनाद्वारे केली जाणार आहे.- सुरेश मेकला, सहपोलीस आयुक्त, ठाण

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस